पराभवाचे खापर धोनीने फोडले सीनियरवर

गेल्या काही दिवसापासून टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होत आहे. पाकिस्‍तानविरुद्धच्या कोलकाता वनडेमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने पाक सोबतची मालिका सुद्धा गमावली आहे. त्यामुळे टीम इंडियाबवर चोफेर टीका होता आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र या पराभवाचे खापर सीनियरवर खेळाडूंवर फोडले आहे. गेल्या काही दिवसापासून सीनियर खेळाडू न खेळल्याने त्याचा दबाव ज्युनियर खेळांडूंच्या कामगिरीवर होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या पराभवानंतर बोलताना टीम इंडियाचा कर्णधार धोनी म्हणाला, ‘ गेल्या काही दिवसापासून संघाची कामगिरी निराशाजनक होत आहे. संघ एका परिवर्तनातून जात असतो तेव्हा सीनियर्स खेळाडूंनी चांगलं खेळणं अपेक्षित आहे, पण सीनियर्स खेळाडूंची कामगिरी निराशजनक होत असल्याने त्याचे दडपण ज्युनियर्स खेळाडूंवर येत आहे. खालच्या ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना ज्युनियर्सवर अधिक दबाव असतो. त्यामुळे येत्या काळात कामगिरीत सुधरणा करून सर्व फलंदाजांना चांगले खेळण्याची गरज आहे.’

सध्याच्या संघात वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि युवराज सिंग हे सीनियर्सच्या आहेत. त्यामुळे धोनीचा रोख सेहवाग, गंभीर आणि युवराज यांच्यावर आहे. त्यांची पाकविरुद्च्या दोन्ही सामन्यात कामगिरी खराब झाली आहे. क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवरुन सवाल उपस्थित झाले आहेत. धोनीची कर्णधार म्हणून कामगिरी फारच वाईट होत आहे. प्रत्येक फॉरमॅटमध्ये तो फेल झाला आहे. त्यामुळे येत्या काळात निवड समिती या पराभवानंतर काय धडा शिकते हे पाहणे ओतसुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment