हिलरींना रूग्णालयातून डिस्चार्ज

वॉशिग्टन दि. ३- अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांना न्यूयॉर्क येथील रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  बुधवारी रात्री हिलरी यांना डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्यांच्यासोबत माजी राष्ट्राध्यक्ष व त्यांचे पती बिल, मुलगी चेलसा हे होते. मेंदूतील नसेत रक्तात गुठळी झाल्यामुळे गेला महिनाभर हिलरी यांना बधिरतेचा त्रास होत होता. त्यांच्यावर उपचार करणार्याी डॉक्टरांनी हिलरी यांची प्रकृती वेगाने सुधारत असल्याचे सांगितले असून त्या या आजारातून पूर्ण बर्याल होतील असेही सांगितले आहे.

पासष्ठ वर्षीय हिलरी यांना गेल्या महिन्यात चक्कर आली होती आणि ७ डिसेंबरपासून त्यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला नव्हता. त्यांच्या तपासण्यात मेंदूत रक्ताची गुठळी झाल्याचे निदान झाले होते.

किलंटन कुटुबियांनी हिलरींवर उपचार करणार्यान डॉक्टर्स, नर्सेस व रूग्णालयातील कर्मचार्याुचे आभार मानले. गेल्याच आठवड्यात हिलरी यांची सतत ११ व्या वेळी जगातील ‘ मोस्ट अॅडमायर्ड वुमन‘ म्हणून निवड झाली होती. गेली चार वर्षे अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली असून आता या पदावरून निवृत्ती घेणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यांच्या जागी सिनेटर जॉन केरी यांच्या नावाची घोषणा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे.

डेमॉक्रेटीक सदस्यांबरोबरच देशभरात अत्यंत लोकप्रिय नेत्यांच्या यादीत वरच्या स्थानावर असलेल्या हिलरी २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीतील प्रबळ दावेदार मानल्या जातात.