आभिनेत्री विद्या बालनने ऐक्ट्रेस असताना देखील सिद्धार्थ रॉय कपूर सोबत लग्न केले आहे. बॉलिवुडमधील बिग लीग मध्ये जरी ते सहभागी झाली असली तरी ती तिच्या जुन्या सहका-याना विसरली नाही. लग्नानंतर तिने ‘कहानी’ या सिनेमाशी संबधित असलेल्या टेक्निशंसला मिठाई पाठवून दिली. तसे पहिले तर, विद्याच्या लग्नाचे सेलिब्रेशन खूप सिंपल होते. त्या लग्नात कसलाच गोंधळ नव्हता अगदी साध्या पद्धतीने हा लग्न पार पडले. त्यामुळे तिची इच्छा असूनही लग्नासाठी तिला ब-याच जणांना बोलावता आले नाही.
विद्याने दिला टेक्निशंसला मिठाई
‘कहानी’ या तिच्या सिनेमाशी संबधित असलेल्या एग्ज़ेक्युटिव प्रड्यूसर अरिंदम सीलने मात्र विद्याच्या या ऐटिट्यूडची प्रशंसा केली आहे. काही दिवसापूर्वीच विद्याने त्याच्या घरी स्वीट्स आणि कार्ड पाठवून दिले आहे. हे सर्व काही पाहून तो खूपच आनंदित झाला. विद्यासोबत त्याने फक्त एका सिनेमातच काम केले आहे. त्यामुळे विद्या घरी मिठाई पाठवून देईल अशी अपेक्षा त्यानी कधी केली नव्हती. एवडेच नव्हे तर, विद्याच्या सेक्रेटरीने फोन करून अरिंदम या ‘कहानी’ सिनेमाशी संबधित असलेल्या टेक्निशंसचा अड्रेस मागवून घेतला व त्यानंतर तिच्या घरी स्वीट्स पाठवून दिले.
तसे पहिले तर, विद्याचे हे नेचर असे सुरुवातीपासूनच आहे. तिने मिळत गेलेल्या यशानंतर कधीच डोक्यात हवा जाऊ दिली नाही. घरी मिठाई पाठवून देऊन मात्र तिने परत एकदा सर्वाकडून कौतुक करून घेतले आहे.
