पाकिस्तानची दमदार सुरुवात

ईडन गार्डनवर भारत आणि पाक यांच्यातील दुसरा वनडे सामना खेल जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकचे सलामीवीर नासेर जमशेद आणि मोहम्मद हाफिज यांनी शतकाची भागीदारी करीत दमदार सुरुवात करून दिली आहे. पाकिस्तानने २० षटकांच्या समाप्तीपर्यंत एकही गडी न गमावता ११८ धावा केल्या आहेत. सध्या तर ही जोडी फोडणे टीम इंडीयाच्या गोलंदाजांना कठीण जात आहे.

रविवारी चेन्नईत झालेल्या पहिल्या वन डेमध्ये पाकने टीम इंडीयाला पराभूत केले होते. त्या सामन्यात गोलंदाज जुनैद खानने टीम इंडीयाचे फलंदाज स्वस्तात बाद करुन दबाव निर्माण केला होता. भारताकडून महेंद्रसिंग धोनी, युवराजसिंग, भुवनेश्वरकुमार, तर पाकिस्तानकडून जुनैद खान, नासेर जमशेद आणि मिसबाह-उल-हक यांची नावे चाहत्यांच्या तोंडी आहेत. या सर्वांनी पहिल्या वनडेत शानदार कामगिरी केली होती. तत्पूर्वी दोन्ही संघांनी बुधवारी कसून सराव केला होता.

शेवटचे वृत हाती आले तेंव्हा पाकने २० षटकांच्या समाप्तीपर्यंत एकही गडी न गमावता ११८ धावा केल्या आहेत. सलामीवीर नासेर जमशेद ५५ धावा तर आणि मोहम्मद हाफिज हा ६१ धावावर खेळत होता. या जोडीला फोडण्याच्या सुरुवातीला काही संधी मिळाली होती. मात्र त्यामध्ये यश आले नाही . सध्या जमलेली ही जोडी फोडणे टीम इंडीयाच्या गोलंदाजांना कठीण झाले असून ५० षटकात किती धाव संख्या उभारतात हे पाहणे ओत्सुक्याचे ठरनार आहे.

Leave a Comment