अॅपल स्टोअरवर दरोडा – १० लाख युरोंची लूट

पॅरिस दि. ३- नवीन वर्षाच्या स्वागतात पॅरिसवासियांसह पॅरिसचे पोलिसही दंग झाले असताना मध्य पॅरिसमधील अॅपल स्टअरमध्ये घुसून चार सशस्त्र दरोडेखोरांनी हजारो युरो किमतीचा माल पळवून नेला असल्याचे समजते. सोमवारी रात्री घालण्यात आलेल्या या दरोड्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. प्राथमिक अंदाजानुसार दरोडेखोरांनी १० लाख युरेा म्हणजे १.३२ दशलक्ष डॉलर्सचा माल दुकानातून पळविला आहे. स्टोअरचे प्रतिनिधी अद्यापही चोरीला गेलेल्या मालाचा आढावा आणि नुकसानीचा अंदाज घेत आहेत.

पॅरिस पोलिस अधिकार्यांचनी दिलेल्या माहितीनुसार नववर्षाच्या स्वागतासाठी चाललेल्या जल्लोषात पोलिसही सहभागी झाले होते आणि प्रंचड गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी जादा पोलिस कुमक कामाला लावली गेली होती. या संधीचा फायदा घेऊन बुरखे घालून आलेल्या चार सशस्त्र दरोडेखोरांनी पॅरिस ऑपरेच्या मागच्या बाजूला असलेल्या अॅपल स्टोअरमध्ये घुसून लूट केली आणि ते व्हॅनमधून पळाले. दुकान बंद झाल्यानंतर सुमारे तीन तासांनी म्हणजे रात्री ९ च्या सुमारास हा दरोडा घातला गेला. लुटलेल्या मालात आयफोन, आयपॅड व मॅक कॉम्प्युटर्सचा प्रामुख्याने समावेश आहे.