अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २०१२ ची एकमात्र सफल कलाकार आहे तिच्या या वर्षातील तीन सिनेमाने नऊशे कोटी रुपये पेक्षा अधिक कलेक्शन केले आहे. यावर्षीच्या सुरुवातीचा तिचा आणि अक्षय कुमारचा ‘राउडी राठौड’ हा सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर अजय देवगन सोबतचा तिचा आणखीन एक ब्लॉकबस्टर “सन ऑफ सरदार” हा सिनेमा आणि वर्षाखेरीस सलमान सोबतचा ‘दबंग-२’ हा सिनेमा हिट ठरला होता.
सोनाक्षीला मिळनार सफलता
या तीन सिनेमाने मिळून बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पेक्षा अधिक कलेक्शन केले होते. तिच्या शिवाय अन्य बॉलीवुड अभिनेत्रीनापण हे वर्ष चांगले गेले. त्यामध्ये कैटरीना कैफ (एक था टाइगर, जब तक है जान), असिन (हाउसफुल-२, बोल बच्चन) आणि प्रियंका चोप्रा (अगि्नपथ, बर्फी) याचा समावेश आहे. तसे पहिले तर अन्य अभिनेत्रीच्या तुलनेत गेल्या वर्षी म्हणजेच २०१२ साली सोनाक्षीची सफलता अद्वितीय अशी ठरली आहे. तिचे हे तीनपण सिनेमा हीरोप्रधान होते. हीरोचा रोल दमदार असला तरी तरी सोनाक्षीची प्रतिभा नाकारून चालणार नाही.
या सफल सिनेमामधील अभिनेते सलमान खान आणि अजय देवगन इंडस्ट्रीमध्ये गेल्या कित्येक वर्षपासून काम करीत आहेत. मात्र सोनाक्षीने १२ महीन्यामध्ये बॉलीवुडमध्ये आपले रेकॉर्ड तयार केले आहे.यासाठी तिची मेहनत आणि भाग्य हे सुद्धा महत्वाचे ठरले आहे. सोनाक्षी म्हणाली, ‘ मी नेहमीच कामला महत्व देते. त्यासोबतच वेळेला महत्व देते, सेटवर मी नेहमीच वेळेवर पोहचते. त्यामुळेच मी अभीनेत्री म्हणून पुढे आली आहे. ‘लुटेरा’ आणि ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’ हे सोनाक्षीचे सिनेमे २०१३ साली येत आहेत.
