पर्यटन व्हिसा घेऊन पत्रकारिता नको: गृहमंत्रालय

नवी दिल्ली: पर्यटक व्हिसा घेऊन भारतात येणाऱ्यांना पत्रकारिता अथवा तत्सम उपक्रम करता येणार नाही; असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जरी केले आहेत. यापूर्वी पर्यटक व्हिसा घेऊन भारतात आलेल्या काही जणांनी काही आक्षेपार्ह लिखाण केल्याचे निदर्शनास अल्याबारून ही कारवाई करण्यात आल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

पत्रकारितेशी संबंधित कामे करण्यासाठी विदेशी नागरिकांना पर्यटक व्हिसा पुरेसा नाही. जे पर्यटक केवळ मनोरंजन, स्थलदर्शन, मित्र आणि नातेवाईक यांच्या भेटीगाठी याच निखळ उद्देशाने भारतात येतात त्यांनाच पर्यटक व्हिसा दिला जातो. पर्यटक व्हिसावर येऊन इतर कोणतेही काम पर्यटकांनी करणे अपेक्षित नाही; असे या सूत्राने स्पष्ट केले.

यापूर्वी कोलोरेडो विद्यापीठातील एक अभ्यासक रॉजर बिलहेम यांनी पर्यटक व्हिसावर भारतात सन १९६७ पासून नियमित भेटी दिल्या. त्यांनी भारतातील अणुप्रकल्प आणि इतर तांत्रिक विषयांवर ८१ लेख लिहिले. त्यांच्या लिखाणापैकी काही मजकूर भीती पसरविणारा असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. त्यामुळे में २०१२ मध्ये पुन्हा भारतात आलेल्या बिलहेम यांना विमानतळावरूनच परत पाठविण्यात आले आणि त्यांना भारतात प्रवेशबंदी करण्यात आली.

अशा काही घटनांमुळे हे आदेश लागू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment