रत्नागिरी: जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक मच्छिमार आणि नागरिकांसह दोन हजार जणांनी अटक करवून घेतली. जैतापूरची मच्छिमार संघटना, स्थानिक शेतकरी, शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.

साखरी नाटे या गावातील मच्छिमार वसाहतीजवळ जमलेले आंदोलक मोर्चाने प्रकल्पाच्या ठिकाणी रवाना झाले. प्रकल्पाच्या अलिकडे १ किलोमीटर अंतरावर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी नाटे नगर विद्यालयाच्या मैदानात तात्पुरत्या कारागृहात करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्पापासून १ किलोमीटर परिसरात संचार बंदी लागू केली होती. पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली होती. मात्र मंगळवारी रात्री उशीरा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही अटींवर आंदोलनास परवानगी देण्यात आली.
आंदोलनाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार प्रकल्पाच्या ठिकाणाला मच्छिमार बोटींनी वेढा घालण्याचे नियोजन होते. मात्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने स्वत:ला अटक करवून घेतली.