सहा वर्षीय बालिकेवर पाशवी बलात्कार

पुणे: केवळ सहा वर्ष बयाच्या मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण हडपसर परिसरात मंगळवारी घडलेआहे. ही मुलगी जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार असून त्याची ओळख पटू शकली नाही.

पुण्यातील गोखलेनगर येथे राहणारी ही मुलगी हडपसरच्या हिंगणे मळा या ठिकाणी आपल्या मावशीकडे गेली होती. सकाळी ती तिच्या मावस बहिणीबरोबर प्रातर्विधीसाठी जवळच्या मैदानात गेली असता एका तरुणाने त्या मुलीला जवळच्या झुडुपात ओढून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिच्या मावस बहिणीने आरडाओरडा करून मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र पहाटेची वेळ असल्याने लोक जमा होण्यापूर्वीच त्या तरुणाने पोबारा केला.

या मुलींनी घरी येऊन घडल्या प्रकारची माहिती दिल्यानंतर पीडीत मुलीच्या मावशीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.