भारत, पाक संघाचा कोलकात्यात कसून सराव

कोलकाता येथील इडन गार्डनच्या मैदानावर गुरुवारी टीम इंडिया आणि पाकिस्तान मधील दुसरा सामना येथे होणार आहे. भारतीय संघातील काही खेळाडूंसह पाकिस्तानचा संपूर्ण संघ येथे सोमवारी दाखल झाला. मंगळवारी टीम इंडिया आणि पाक संघांनी ईडन गार्डन्सवर कसून सराव केला. टीम इंडियाच्या दृष्टीने हा सामना महत्वपूर्ण असून चेन्नई येथिल पहिला सामना जिंकून पाक संघाने तीन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे स्पधेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे.

टीम इंडियाचे खेळाडू वेगळ्या गटांनी येथे दाखल होणार आहेत. सोमवारी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, प्रशिक्षक डंकन फ्लेचर, रवींद्र जडेजा आणि अशोक दिंडा यांचे आगमन झाले. अन्य खेळाडू मंगळवारी दाखल झाले, तर पाकिस्तानचा संपूर्ण संघ सोमवारीच दाखल झाला आहे. मंगळवारी दोन्ही संघानी नेत्माधेय कसून सर्व केला. यावेळी कर्णधार धोनीने भारतीय फलदाजाला काही टिप्स दिल्या.

कोलकता येथील सामना टीम इंडियाच्या दृष्टीने करो या मरो असणार आहे. आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना जिंकावा लागणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये पाकिस्तानने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळेच आता टीम इंडिया कसून सराव करीत आहे.

Leave a Comment