चित्रांगदा झळकणार आता अर्जुन समवेत

चित्रांगदा सिंह बॉलीवुडची बोल्ड अभिनेत्री असली तरी तिने त्याबाबात काही सीमा ठरवल्या आहेत. सिनेमात ती बोल्ड सीन्स करताना सीमा ठेवूनच एक्टिंग करीत असते. चित्रांगदा सिंहने काही दिवसापूर्वी रिलीज झालेल्या जोकर या सिनेमात आयटम सॉंग केले होते. तेंव्हापासून ती चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर ती आता अर्जुन रामपाल सोबत इंकार या सिनेमातून झळकणार आहे.

चित्रांगदा सिंह कुठल्यापण सिनेमात काम करताना बोल्ड दृष्य देताना ती काळजी घेत असते. इंकार या सिनेमात अर्जुन रामपाल आणि चित्रांगदा सिंहने मुख्य भूमिका केली आहे. हा सिनेमा ऑफिसमध्ये महिला कर्मचा-यासोबत होना-या लैगिक शोषणावर आधारित आहे. या सिनेमात चित्रांगदा सिंह आणि अर्जुन रामपाल यांचे काही इंटिमेट सीन्स आहेत. या सिनेमातील काही सीन एवढे बोल्ड आहेत की हे सीन पाहून सर्वजन हैराण होतील.

याबाबत बोलताना चित्रांगदा सिंह म्हणाली ‘ मी बोल्ड दृष्य शूटिंगच्या कलाकाराना आणि दिग्दर्शकना सहज वाटतील तोपर्यंतच करत असते. मी त्यासाठी काही सीमा ठरविल्या आहेत. सिनेमात आयटम सॉंग करीत असताना मी नेहमी ते सोंग हिट होईल याची काळजी घेत असते. इंकार सिनेमात अर्जुन रामपालने सर्वात चागले काम केले आहे.’ महिला लैगिक शोषणाचा देखील तिला एकदा त्रास झाल्याचे तिने यावेळी बोलताना स्पष्ट केले.