सलमान सोबत पुन्हा दिसणार कैटरिना

गेल्या काही दिवसापासून कैटरिना पुन्हा सलमानसोबत दिसत आहे. तसे पहिले तिची ठरवून किंवा अनावधनाने का होइना सलमानशी भेट होतेच. दुबई मधील एका स्टेज परफॉर्मेंससाठी कैटरिना शाहरुखसोबत परफॉर्म करनार होती. ऐनवेळी त्याने सर्व प्लान बदलला आणि पुन्हा कैटरिना सलमानकडे परतली आहे. आता ती या शो मध्ये सलमान सोबत झळकणार आहे.

आता कैट सलमान सोबत सिलेब्रिटी क्रिकेट लीगच्या दरम्यान डान्स करणार आहे. यापूर्वी इवेंट ऑर्गनाइजर्सने शाहरुखकडे कोणासोबत डान्स करणार अशी विचराना केली होती. त्यावेळी त्याने कैटरिनाचे नाव घेतले होते. त्यामुळे सर्वजन आश्चर्य व्यक्त करीत होते. यापूर्वी एका इवेंटवेळी सलमानने प्रियंका सोबत परफॉर्म करणार असे म्हटले होते. त्यामुळे शाहरुखने कैटरिनाचे नाव घेतले होते.

त्यावेळी मात्र येत्या काळात काय होणार याची कल्पना शाहरुख खानला नव्हती. मात्र शाहरुख आणी कैटरिनाच्या परफॉर्मेंसची डीटेल्स पूर्ण होण्यापूर्वीच कैटने सलमान सोबत डान्स करण्याचे ठरविले आहे. सुत्रानें दिलेल्या माहितनुसार हा परफॉर्मेंस १९ जानेवारी होणार आहे. कैटने त्यासाठी तयारी सुरी केली आहे. परफॉमर्सच्या लिस्टमध्ये बिपाशाचे सुद्धा नाव होते, त्यानंतर कैटचे नाव फायनल झाले आहे. तसे पहिले तर सलमान सुद्धा कैटरिना सोबतच्या परफॉर्मेंसच्या बाबतीत एक्साइटेड आहे. गेल्या काही दिवसापासून कैटरिना आणि सलमान सोबत डान्स करण्याचा सराव करीत आहे.

Leave a Comment