वॉशिंग्टन दि.१ – इलेक्ट्रोनिक सिगरेट म्हणजेच ई सिगरेट धूम्रपानाची सवय सोडविण्यास फारशी उपयुकत नाही कारण त्यातूनही अल्प प्रमाणात का होईना पण निकोटीनची मात्रा ही सिगरेट ओढणार्याणच्या शरीरात जाते असे इटालियन आरोग्य विभागाने सरकारला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. तरूणांत ही सिगरेट फॅशन गॅजेट म्हणून वापरली जाण्याचा धोका मोठा आहे मात्र त्यामुळे तरूणांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. शिवाय गॅजेट म्हणून वापर करतानाच खर्या सिगरेटचा स्वाद घेण्याचा मोह तरूणांना पडू शकतो असेही त्यांचे म्हणणे आहे.
ई सिगरेट म्हणजे इलेक्ट्रोनिक उपकरण असून त्यात प्लॅस्टीक कार्टिरेज, बॅटरी, माऊथपीस, विशिष्ठ वासाचे द्रव व या द्रवाची आपोआप वाफ करणारे अॅटोमायझर यांचा समावेश आहे. यात वापरल्या जात असलेल्या विविध वासाच्या द्रवात विविध तीव्रतेच्या निकोटीन या विषारी द्रव्याचा पवार करण्यात आला आहे. तंबाखूच्या सिगरेट धुरासारखीच वाफ या उपकरणातून तयर केली जाते मात्र ती वाफ श्वासावाटे आत खेचली जाते व परिणामी निकोटिनची अल्प मात्रा थेट रक्तात जाते. निकोटीनचे प्रमाण अल्प असल्याने त्यापासून धोका कमी असू शकेल मात्र धोका नाही असे ठामपणे म्हणता येत नाही असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
दरम्यान ई सिगरेटच्या उत्पादकांनी मात्र ही सिगरेट अगोदरच ज्यांना धूम्रपानाची सवय आहे, त्यांची ती सवय कमी करण्यासाठी तयार केली असल्याचा दावा केला आहे. परिणामी धूम्रपान न करणार्यां ना त्याची सवय लागण्याची शक्यता नाही असे त्यांचे म्हणणे आहे.