शाहरुखला फैन्सने बनविले स्टार – सलमान

अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या हार्ड वर्क आणि फैन्समुळेच स्टार बनला आहे. शाहरुख खान साठीचे हे शब्द त्याचा कोणी दोस्त अथवा फैनने काढले नाहीत तर, तर खुलेआमपने शाहरुख खान सोबत दुश्मनी घेणा-या बॉलीवूडचा टायगर सलमान खानने काढले आहेत.

इंडस्ट्रीमधील दोन खान, शाहरुख-सलमान यांची दुश्मनी आणि त्यांच्यात असलेल्या भांडणामुळे सर्वाना परिचित आहेत. सलमान असो अन्यथा शाहरुख, दोघेपण मौका मिळाल्यानंतर दुश्मनी पब्लिकला दाखविण्यापासून हाटत नाहीत. सलमान खान गेल्या काही दिवसापासून ‘बिग बॉस’ च्या सेटवर शाहरुखला सतत बेइज्जत करण्याचा एक ही संधी सोडत नाही. ‘बिग बॉस’ च्या घरातील मेंबर असलेल्या इमानाने जेंव्हा शाहरुखच्या बाबतीत काही कमेंट केल्या तेंव्हा मात्र सल्लू मियां चांगलाच भडकला होता.

काही दिवसापुर्वी इमामने सलमानला सांगितले की मोठ्या ब्रैंडच्या शाम्पोच्या जाहिरातीसाठी शाहरुखला अन साबणाच्या जाहिरातीसाठी प्रीति जिंटाला कास्ट केले होते. यावरून सलमान चांगलाच भडकला, सलमान म्हणाला, ‘ शाहरुखला तर देवाने शाहरुख खान बनविले आहे. आज तो जो आहे तो मेहनत आणि कामविषयी असलेल्या प्रेमामुळे आहे. त्याला नेहमीच फैन्सचा सुद्धा सपोर्ट राहिला आहे. तसेच काहीसे प्रीति जिंटाच्या बाबतीत सुद्धा आहे.’

आतापर्यंत या शो मध्ये प्रीति जिंटा आली असेल अथवा, करीना कपूर किंवा कैटरीना कैफ, सलमानला जेंव्हा मोका मिळेल त्यावेळेस शाहरुख सोबतची दुश्मनी उकरून काढली आहे. मात्र इमामने असे म्हटल्यानंतर सलमानने शाहरुखची स्तुती केली. याबाबत शाहरुखने मात्र मनापासून सल्लूचे आभार मानयला हवेत.