लंडन दि.३१- मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेटस यांची पत्नी, जागतिक आरोग्य प्रचारक मिलिंडा गेटस यांनी त्यांच्या दोन मुली आणि मुलगा यांना अॅपलची प्रॉडक्ट वापरण्यास बंदी घातली आहे. त्यांच्या दोन मुली आणि मुलाने त्यांच्याकडे आयपॉडची मागणी केली होती. मात्र त्यांना विंडोजची उपकरणेच वापरणे बंधनकारक केले गेले आहे असे समजते.
याविषयी अधिक स्पष्टीकरण देताना मिलिंडा म्हणाल्या की आम्हाला जी सुबत्ता मिळाली आहे ती सारी मायक्रोसॉफ्ट मुळेच. त्यामुळे आमची व्यवसायातील प्रतिस्पर्धी असलेली अॅपल कंपनी आणि त्यांचे प्रॉडक्टस आम्ही विकत घेणे हे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. २००९ साली मायक्रोसॉफट विंडोज फोन इंड्रोडयूस करण्याअगोदर अॅपलच्या आयफोनला मिळालेली लोकप्रियता वादातीत होती आणि त्यावेळी आपल्यालाही अॅपल प्रॉडक्टसचा मोह पडला होता असेही मिलींडा यांनी यावेळी मान्य केले.
अर्थात मिलिंडा यांनी मुलांना अॅपल प्रॉडक्ट वापरण्यावर बंदी घातली असली तरी गेल्यावर्षी त्यांची मोठी मुलगी जेनिफर सिडने येथे जॉगिंग करत असताना अॅपलचा आयफोन तिच्या हातात होता आणि तिची त्यासोबतची छायाचित्रेही वर्तमानपत्रांनी प्रसिद्ध केली होती.