२०१२ला निरोप देताना …..

२०१२ सालाला निरोप देण्यासाठी व २०१३ च्या स्वगतासाठी आपण सज्ज झालो आहोत. तसे पहिले तर २०१२ साली प्रिय पेक्षा अप्रिय घटनाच खुप घडल्या. त्यामुळे हे वर्ष कधीच विसरता येणार नाही. विशेषता काही अप्रिय घटनांनी हे वर्ष सरते आहे. या वर्षांमध्ये खूप लाडके नेते, अभिनेते, समाजासाठी आदर्श ठरलेल्या व्यक्ती काळाच्या पडद्याआड नेल्या. निसर्गही कोपला असून पावसाअभावी काही ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. त्याशिवाय कुठे गँगरेप, कुठे जबरी हल्ले यामुळे समाज ढवळून निघाला आहे. सरत्या वर्षात विविध क्षेत्रात महत्वाच्या घटना घडल्या त्याचा घेतलेला आढावा .

या वर्षभरात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काळानी आपल्यातून हिरावून नेले. त्यासोबतच काही अभिनेत्याना सुद्धा गमवावे लागले. यंदाचे वर्ष महिलाच्या दृष्टीने तर ख-या अर्थाने काळे वर्ष ठरले. दिल्ली तर घटना तर समाजमानला हादरा देणारी आहे. महिलावर होणा-या अत्याचारच्या घटनामुळे समाजात संताप होतच त्याचा उद्रेक झाला आहे. हा उद्रेक केवळ दिल्लीतील घटनेने झाला नाही तर अत्याचाराचे समर्थन कारण-या पुरुषी मानसिकतेचा झाला आहे. गेल्या काही दिवसात विनयभंग, बलात्कार, हुंड्यासाठी होणार छळ अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात कामानिमित घराबाहेर पडना-या महिलाची संख्या वाढली आहे. हे प्रमाण वाढत जाणार आहे. परतू यासाठी सरकारकडून काहीच उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे अत्यचाराचे प्रमाण वाढत आहे. गेल्या काही दिवसात नेहमीच आता ऐकण्यास मिळत आहे. कुठे बलात्कार तर कुठे ब्लेड हल्ला, कुठे केमिकल हल्ला तर कुठे कोयता हल्ला असे चित्र सध्या दिसत आहे. दिल्लीतल्या बलात्कार पिडीत मुलीला न्याय मिळून देण्यासाठी संतप्त तरुणांनी मोर्चा काढला. मात्र या मुळे न्याय मिळेल काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

दुसरीकडे गर्भ लिंग निदान आणि मुलीची कमी होणारी संख्या याबाबत या वर्षात बरेच काही घडले. १९९१ च्या तुलनेत २००१ साली त्या तुलनेत २०११ मध्ये मुलीच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. २०११ च्या जनगणनेनंतर ही भयावह परिस्थिती समोर आली आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात मुलीचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. विशेषता बीड जिल्ह्याचा तर देशातील कमी महिलांची संख्या असलेल्या १० जिल्ह्ययात समावेश झाला आहे. २००५ साली येथे लेक लाडकी अभियानायाने स्टिंग ऑपरेशन करण्यात आले त्यामध्ये काही जन दोषी आढळले.

बीड जिल्ह्यातील परळी येथे मुंढे हॉस्पिटलमध्ये तर उघडपणे गर्भलिंगनिदान आणी बेकायदा गर्भपात होत असतो. २०१० मध्ये याठिकाणी एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यामध्ये एकाच दिवशी ९० गर्भ लिंग निदान केल्याचे आढळून आले याशिवाय ४० जनाचे मुली असल्याने गर्भपात देखील करण्यात आल्याचे तेथील नोदीवरून स्पष्ट झाले. २०११ मध्ये १५ स्त्री जातीचे गर्भ डॉक्टर मुंडे यांच्या हॊस्पिटलमध्ये आढळून आले तरी पण त्यांचा जामीन झाला. त्यानंतर २०१२ वर्ष मात्र महत्वपूर्ण ठरले. धारूर येथिल सूनदा पठेकर या महिलेचा गर्भपात करीत असताना मुडे यांच्या हॊस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तरी पण त्यांचा जमिन मंजूर झाला होता. मात्र काही दिवसानंतर दखलपत्र गुन्हा दाखल झाला. त्यानंतर फरार असलेल्या मुंडे दाम्पात्यला अटक करण्यात आली. गेल्या सहा महिन्यापासून ते अजून जेलची हवा खात आहेत.

तर यावर्षी पाऊसच झाला नसल्याने सर्व राज्यात दुष्काळी परीस्थिती आहे. काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पाणी नसल्याने नागरिकांना भटकती करावी लागत आहे. मराठवाडयातील परिस्थिती खूपच गंभीर आहे. यावर्षी पावसाअभावी पिण्यासाठी सुद्धा पाणी नसल्याने दुष्काळी परिस्थिती गंभीर बनली आहे. मात्र यावर्षी तर राज्य भारनियमन मुक्त होईल असे वाटत होते. मात्र तसे काही झाले नाही.

Leave a Comment