टोनी ग्रेग यांचे निधन

मेलबर्न: इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक टोनी ग्रेग यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते.

गराग यांना मागील काही वर्षापासून फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले होते. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघांदरम्यान ओगस्ट महिन्यात दुबई येथे झालेल्या क्रिकेट मालिकेपासून त्यांचा आजार अधिक बळावला. त्यांच्यावर मेलबर्न येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

टोनी ग्रेग यांनी आपल्या ५ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत ५८ कसोटी सामने खेळले त्यांनी ४०. ४३ च्या सरासरीने ३ हजार ५९९ धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना त्यांनी १४१ फलंदाजांना बाद केले. एकूण २२ एकदिवसीय सामनेही ते खेळले.

क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांनी कारकीर्द संपविल्यानंतर समालोचक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. समालोचक म्हणून त्यांना मोठी लोकप्रियता लाभली.

Leave a Comment