एकनाथ खडसे हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

पुणे: जळगाव येथून पुण्याला हेलिकॉप्टरमधून निघालेले विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या हेलिकॉप्टरला हवेतच आग लागली. मात्र वैमानिकाने समयसूचकता दाखवूनहेलिकॉप्टर सुरक्षितपणे पुण्यात उतरविले.

या हेलिकॉप्टरमध्ये भाजप सरचिटणीस श्रीकांत भारतीय, पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष विकास मठकरी आणि खडसे यांची कन्याही होती. हेलिकॉप्टर हवेत ११ हजार फूट उंचीवर असताना कॉकपीटमधून धूर येऊ लागला आणि हेलिकॉप्टरने पेट घेतल्याचे आढळून आले.

मात्र वैमानिकाने प्रसंगावधान दाखवित हेलिकॉप्टर सुरक्षित उतरविले.

Leave a Comment