‘राष्ट्रवादी’ला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवा: अजित पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठ पक्ष बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे; अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कॉर्पोरेट कार्यालयाच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसने उभारलेल्या अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आदी मान्यवर नेते उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचा विषय प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने मांडला असून त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने करू नये; असा इशाराही पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना दिला.

राष्ट्रवादीच्या या नव्या कार्यालात एकून १८ दालने असून कार्यालयाचा प्रत्येक भाग सीसी टीव्ही केमेऱ्याच्या नजरेखाली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी स्वतंत्र दालन असून पक्षाच्या बैठकीसाठी दोन मोठी तर एक लहान दालन आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांना थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध असलेले अद्ययावत मिडीया सेंटरही या कार्यालयात आहे.

Leave a Comment