पुणे दि.२६ – यंदाच्या वर्षात देशातील प्रमुख कांदा उत्पादक आणि कांदा निर्यात करणारे राज्य असलेल्या महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन लक्षणीयरित्या घटले असून गेली दोन वर्षे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि सिंचनासाठी पाण्याची असलेली कमतरता ही त्यामागची मु्ख्य कारणे असल्याचे महाराष्ट्र कृषी विपणन बोर्डाच्या वरीष्ठ अधिकार्यांरनी सांगितले.
महाराष्ट्रात कांदा उत्पादनात ५० टक्के घट
याविषयी अधिक माहिती देताना बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक किशोर तोष्णीवाल म्हणाले की गेल्या वर्षात राज्यात५८.२३ लाख टन कांदा उत्पादन झाले होते ते यावर्षात २९.५ लाख टनांवर येईल असा अंदाज आहे. पावसाअभावी आत्ताच सरोवरे आणि पाणीसाठे कोरडे पडले आहेत. पाण्याची चणचण गेली दोन वर्षे जाणवत असून त्यामुळे यंदा बर्याोच शेतकर्यां नी कांदा पेरलेलाच नाही. जून ते सप्टेंबर या महिन्यात येणार्याी कांद्यावर वाईट परिणाम झाला आहे.हा उन्हाळी कांदा वास्तविक टिकायला अधिक चांगला असतो आणि त्याची निर्यात गल्फ देशांत केली जाते.
कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार गतवर्षी राज्यात कांदा लागवडीखालचे क्षेत्र ३.८७ लाख हेक्टर होते ते यंदा १.८९ लाख हेक्टरवर आले आहे. त्यामुळे यंदा कांद्याची चणचण जाणवणार असून दरही भडकण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली नाही. नोव्हेंबर अखेर ५१,७०० टन कांदा निर्यातीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. निर्यातीच्या कांद्याला १५ ते १६ हजार रूपये प्रतिटन असा भाव आहे. गतवर्षी १५.५२ लाख टन कांदा निर्यातीतून २१४१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यातील महाराष्ट्राचा वाटा ८० टक्के होता. शिवाय खासगी निर्यातदारांनी निर्यात केलेला कांदा वेगळाच होता.
मलेशिया, गल्फ, श्रीलंका, दुबई, कुवेत या देशांत कांदा निर्यात केली जाते आणि देशात मध्यप्रदेश, गुजराथ, कर्नाटक, राजस्थान या राज्यात कांदा उत्पादन होत असले तरी येथील कांदा स्थानिक बाजारातच विकला जातो. महाराष्ट्रातूनच सर्वाधिक निर्यात केली जाते. गेली तीन वर्षे कांद्याच्या किमतीत सतत चढउतार होत असून एकेवर्षी तर कांद्याने ८० रू. किलोची पातळीही गाठली होती. सबब सरकारने कांदा दर स्थिर रहावेत आणि शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही त्याचा लाभ व्हावा यासाठी आत्ताच उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही अधिकार्यां नी सांगितले.
