कुमार संगकाराने केल्या दहा हजार धावा

मेलबर्न येथे बुधवारपासून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज कुमार संगकारा याने दमदार फलंदाजी करून काहीसा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा डाव अवघ्या १५६ धावावर गुंडळला. मात्र यावेळी संगकाराने कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे.

मेलबर्न येथील क्रिकेट मैदानावर सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात चौकार मारून संगकाराने दहा हजार धावांचा टप्पा ओलडला आहे. कसोटीमध्ये दहा हजार धावा पल्ला पार करणारा संगकारा जगातील अकरावा फलंदाज आहे. यापूर्वी श्रीलंकेचा कर्णधार माहेला जयवर्धने याने १० हजार पेक्षा अधिक धावा पूर्ण केल्या आहेत. १० हजार धावा पूर्ण करणारा संगकारा हा श्रीलंकेचा दुसरा फलंदाज ठरला आहे. संगकाराने ११५ कसोटी सामन्यांमध्ये १९५ डावांत ही कामगिरी केली आहे.

कसोटी सामन्यात यापूर्वीच भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विंडीजचा शैलीदार फलंदाज ब्रायन लारा यांनी हा टप्पा पार केला आहे. त्याशिवाय सुनील गावस्कर व ऑस्ट्रलियाचा फलंदाज अलेन बोर्डर यांनी देखील हा टप्पा पार केला होता. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावे आहे.

Leave a Comment