नरेंद्र मोदींचे शपथग्रहण

अहमदाबाद: गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा ग्रहण केली. त्यांच्यासह ७ केबिनेट आणि ९ राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. अलाहाबाद येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये शपथविधीचा शानदार समारंभ पार पडला.

मोदींच्या शपथविधीला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जनता दल (यु) वगळता सर्व घटक पक्षांचे नेते आवर्जून उपस्थित होते. रालोआचे घटक नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यादेखील या कार्यक्रमाला उपठीत होत्या. राज ठाकरे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमातील आकर्षण असले तरीही दोघांनी एकमेकांपासून अंतर राखणे पसंद केले. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे राज ठाकरे यांच्या शेजारी विराजमान झाले तर उद्धव यांच्या शेजारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद बसले होते.

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते आणि देशभरातील भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या मान्यवरांशिवाय माजी क्रिकेटपटू खासदार नवज्योतसिंग सिद्धू, हेमा मालिनी, गायक किरण खेर, अभिनेते सुरेश अणि विवेक ऑबेरॉय या सेलिब्रिटीजनीही या कार्यक्रमात हजेरी लावली.

Leave a Comment