‘रॉकस्टार’ मध्ये नसल्याचे दुख होते- दीपिका

गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री दीपिका पदुकोन चांगलीच फ़ॉर्मममध्ये आहे. २०१२ साली तिचा रोमांटिक व कॉमिडी असलेला ‘कॉकटेल’ सिनेमा हिट ठरल्याने खुश आहे. तर २०११ मधील रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार’ सिनेमा सोडल्याचे आता तिला दुख वाटत आहे. २०१२ सालाबाबत कोणी विचारले तर ती कॉकटेलसारखा सुपरहिट सिनेमा केल्याचे खुश होऊन सांगत आहे.

याबाबत बोलताना दीपिका म्हणाली, ‘ ऑडियंसने माझ्या रोलचे खुपच कौतुक केला आहे. त्यामुळे मी सध्या खूप खुश आहे. मात्र मी गेल्या वर्षाबाबत बोलताना काहीही सांगत नाही. मात्र गेल्या वर्षाबाबत कोणी जर खोचून विचारले तर मी ‘रॉकस्टार’ मध्ये रोल केला असता तर मी यशस्वी ठरले असते असे वाटते. मी हा रोल सोड्याला नको होता असे आता वाटत आहे. त्यामुळे माझे गेल्या वर्षी नुकसान झाले आहे.’

काही दिवसापूर्वी दीपिका आणि रणबीरने काही काळ डेटिंग केली होती. दोघेजण वेगळे होण्यापूर्वी ‘बचना ए हसीनो’ या सिनेमात एकत्रित होते. इम्तियाज अली यांच्या रॉकस्टार’ सिनेमातील तिचा रोल पाकिस्तानी व अमेरिकन अभिनेत्री नरगिस फाखरीने केला आहे. याबाबत दीपिका म्हणाली, ‘तसे पहिले तर अनेक सिनेमे असे आहेत की, त्या सिनेमात काम केले नसल्याबद्दल मला वाईट वाटते. मी त्या सर्व सिनेमाचे आता नाव नाही सांगणार. मात्र अशास्वरूपाचा निर्णय मीच घेतला होता.’

Leave a Comment