यामाहा आणणार २५० सीसी स्पोर्टस बाईक

नवी दिल्ली दि.२४- मोटरबाईक उद्योगातील बलाढ्य कंपनी असलेल्या यामाहा या जपानी फर्मने भारतीय बाजारपेठेत २०१४ सालात २५०सीसी स्पोर्टस बाईक आणणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या कंपनी दोन वर्षे स्कूटर निर्मितीवरच सर्व लक्ष केंद्रीत करणार आहे असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

इंडिया यामाहा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक हिरोकुशी सुझुकी या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की, येती दोन वर्षे स्कूटर उत्पादनावरच कंपनीचा भर आहे मात्र भारतीय बाजारपेठेत स्पोर्टी मोटसबाईकसना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे २०१४ सालात यामाहा २५० सीसीची स्पोर्टी मोटरसायकल बाजारात आणणार आहे. सध्या कावासाकीची निंजा आणि होंडाची प्रिमियम स्पोर्ट या दोन २५० सीसी सेगमेंटमधील मोटरबाईक भारतीय बाजारात आहेत. त्याचबरोबर बजाज, हिरो कॉर्प स्पोर्टी मोटरबाईक सेगमेंटमध्ये आहेत. यामाहाच्या मात्र १५० सीसीच्याच मोटरबाईक भारतीय बाजारात आहेत.२०१५ पर्यंत १२५ सीसीच्या बाईक भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर येणार असून त्या चेन्नईतील प्रकल्पातच तयार केल्या जातील.

भारतात उत्पादित केलेल्या आर १५ व १५० सीसी स्पोर्टस मोटरबाईकची जपानला निर्यात होत आहे. ही निर्यात आक्टोबर १२ पासून सुरू झाली असून यानंतरही अनेक मॉर्डल्स जपानला निर्यात केली जाणार आहेत. जपानमध्ये भारताच्या तुलनेत या बाईक्सची किंमत दुप्पट आहे असेही सुझुकी यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment