पाक विरुद्धच्या लढतीसाठी टीम इंडिया सज्ज

बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाची लढत मंगळवारी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पाक विरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज होत आहे. भारतीय भूमीवर पाक संघाचा हा पहिलाच टी-२० सामना आहे. भारताने आतापर्यंत पाकला तीन वेळा परभूत केले होते. हे तिन्ही सामने टी-२० वर्ल्डकपमध्ये झाले होते.

टीम इंडिया व पाक या दोन्ही संघांकडे यंग खेळाडूंची फौज आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून टीम इंडिया मालिका विजयाच्या प्रतीक्षेत आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन दिवस त्यांनी नेटमध्ये कसून सराव केला आहे. भारतासाठी दुबळी गोलंदाजी ही चिंतेची बाब आहे. दुबळ्या गोलंदाजीमुळेच भारताला इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेतील शेवटचा सामना गमावावा लागला होता. दुसरीकडे १५ दिवसांचा कसून सराव केल्यानंतर पाक संघ भारतात दाखल झाला आहे. पाहिल्यादा त्यांना भारतात टी-२० मलिका खेळण्याची संधी लाभली आहे. त्यामध्ये ते कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे ओत्सुक्याचे ठरनार आहे.

टीम इंडियाची मदार युवराजसिंग, सुरेश रैना, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, धोनी आणि गौतम गंभीर या फलंदाजावर असणार आहे. त्याशिवाय युवराजसिंगने दोन सामन्यात उपयुक्त गोलंदाजी केली आहे. तर पाकची फलदांजीही तगडी आहे, विशेषता हफिज, कामरान अकमल, उमर अकमल, अहेमद शाहजाद, शोएब मलिक धावा काढण्यात तरबेज आहेत. त्यामुळे टीम इंडियाला हा समान जिंकायचा असेल तर गाफील राहून चालणार नाही. रात्री दव पडत असल्याने नाणेफेकीचा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

Leave a Comment