पहिल्या २०-२० सामन्यात पाकिस्तानचा विजय

मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्या अर्धशतकी खेळीने पाकिस्तानने भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. त्याआधी आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यात भारताच्या भुवनेश्वर कुमारने पाकिस्तान संघाची दाणादाण उडवली . कुमारच्या भेदक गोलंदाजीने पाकिस्तानची अवस्था तीन बाद १२ अशी झाली होती. मात्र हाफिज आणि मलिक यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानचा विजय सोपा केला. या विजयासह पाकिस्तानने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघादरम्यानचा दुसरा टी-२० सामना २७ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला होता. गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. दोघांन पहिल्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी करुन भारताला दमदार सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी धाव संख्या उभा करता आली नाही. रहाणे ४२ धावांवर बाद झाला. त्याला उमर अकमलने बाद केले. त्यानंतर गंभीर ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विराट कोहली(नऊ), युवराज सिंग(१०), महेंद्रसिंग ढोणी(एक), सुरेश रैना(१०), रोहित शर्मा (दोन), रविंद्र जडेजा(दोन), इशांत शर्मा (०) निराशजनक खेळी केली

Leave a Comment