सचिनच्या निवृत्तीची चर्चा निरर्थक

नवी दिल्ली: भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत सर्व स्तरावर चर्चा झडत असताना सचिनने पाकिस्तान आणि इंग्लंड या क्रिकेट संघांबरोबर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यासाठी त्याने निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सचिन दीर्घ काळापासून अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू आहेत. नागपूर कसोटीनंतर तो निवृतीची घोषणा करेल; ही चर्चा जोरात होती. मात्र सचिन आपला हरवलेला फॉर्म परत मिळविण्यासाठी उत्सुक असून त्याचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाबरोबर होणारी मालिका असणार आहे. त्यासाठी सचिन पाकिस्तान आणि इंग्लंड संघांशी होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळण्यास उत्सुक आहे.

सचिनच्या या भूमिकेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने पाठींबा व्यक्त केला. सचिन अजूनही खेळू शकतो. त्याच्या टीकाकारांना काय वाटते यापेक्षा त्याला स्वत:ला, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीला काय वाटते हे अधिक महत्वाचे आहे; असे मत गांगुली याने व्यक्त केले.

Leave a Comment