…तरी पण सेन्सर बोर्डाचा ‘मन डोला’

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘मटरु की बिजली का मंडोला’ या सिनेमावर सेंसर बोर्ड एवढे मेहरबान का झाले हे समजत नाही. काही प्रेक्षकाच्या मते विशालने या सिनेमात अश्लील शिवीगाळ असेलेले सीन दाखविले असून] तरीपण सेंसर बोर्डने या सिनेमला यू/ए चे सर्टिफिकेट दिले आहे. ‘मटरु की बिजली का मंडोला’ हा सिनेमा जशा प्रकारे बोर्डने पास केले आहे, त्यामुळे हा सिनेमा आगामी काळात टीवीवर पण सेंसरची परवानगी न घेता दाखविता येणार आहे. हा अश्लील शिवीगाळ असलेला हा सिनेमा आगामी काळात लहान मुलांना टीवीवर पाहवा लागणार आहे.

या सिनेमात अश्लील शिवीगाळ केली गेली आहे. तर पण यू/ए का सर्टिफिकेट सेंसर बोर्डाने दिले आहे. यापूर्वी पण सेंसर बोर्डने इमरान खानच्या एका सिनेमाला पण परवानगी दिली होती. त्याचा ‘देलही बेली’ या सिनेमला बोर्डाने परवानगी दिली होती. त्याच प्रमाणे आता आगामी काळात येत असललेल्या ‘मटरु की बिजली का मंडोला’ या सिनेमाला यू/ए म्हणजेच यूनिवर्सल/अडल्ट हे सर्फिफेकेट दिले आहे. या सिनेमातील अश्लील शिवीगाळ ही आगमी काळात येत असलेल्या सिनेमाच्या दृष्टीने चांगले संकेत नसल्याचे मत काही सिनेसृष्टीतील मंडळींनी व्यक्त केले आहे.

इमरान खान, पंकज कपूर आणि अनुष्का शर्मा असलेल्या या ‘मटरु की बिजली का मंडोला’ या सिनेमाला सेंसर बोर्डचे सर्टिफिकेट मिळाले आहे. सुरुवातीला हा सिनेमा सेंसर बोर्डकडे एक्जामिनिंग कमिटीकडे गेला त्यावेळी सिनेमातील अश्लील शिवीगाळ असलेले संवाद कट करण्याची शर्त ठेवून यू/ए सर्टिफिकेट दिले होते.मात्र त्यानंतर दिग्दर्शक विशाल भारद्वाजने एक्जामिनिंग कमिटीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर रिवाइजिंग कमिटीने या सिनेमाला कोणतेच सीन कट न करता परवानगी दिली आहे.