सामुहिक बलात्काराच्या विरोधात राजधानीत आक्रोश

दिल्ली: राजधानीत बसमध्ये युवतीवर झालेल्या सामुखिक बलात्काराच्या निषेधार्थ दिल्लीतील युवक, युवतींनी ठिकठीकाणी तीव्र निधार्षाने केली. एरवी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असलेले राष्ट्रपती भवनही त्यापासून सुटू शकले नाही.

रविवारी राजधानीत सार्वजनिक बसमध्ये नराधमांनी एका युवतीवर अमानुष अत्याचार केले. या निर्घृण प्रकाराबाबत सर्वसामान्य जनतेकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी दिल्लीतील युवतींनी थेट राष्ट्रपती भवनवरंच धडक मारली. अनेक तरुणांनीही त्यांना साथ दिली. या संतप्त जमावाने लैंगिक अत्याचाराच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करीत महिलांच्या सुरक्षेसाठी काटेकोर उपाययोजना करण्याची मागणी केली.

दिल्लीत जंतर- मंतर अणि इंडिया गेट या ठिकाणीही नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. नागरिकांच्या या क्षोभामुळे राजधानीत ठिकठीकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. दिल्लीसह मुंबई, कोलकाता, अमृतसर अशा अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून महिलांनी या भीषण कृत्याचा निषेध केला.

दरम्यान; सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मुकेश याला तिहार कारागृहातील अन्य कैद्यांनी मारहाण केली. मुकेशची रवानगी स्वतंत्र कोठडीत करण्यात आली आहे.

Leave a Comment