आगामी काळात इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. उर्वरित ही तीन सामने जिंकुन भारताला आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविण्याची नामीसंधी सध्या चालून आली आहे. त्यामध्ये टीम इंडियाने पुणे येथील इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकून आघाडी घेतली आहे. यापुढील तीन टी-२० मध्ये विजय मिळवल्यास टीम इंडिया जागतिक क्रमवारीत नंबर एकवर येणार आहे.
पुणे येथील इंग्लंडविरुद्धचा पहिलाच टी-२० सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. कसोटी मालीकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी चालून आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यात आता उर्वरित सामना मुंबई येथे खेळला जाणार आहे.. त्यानंतर भारत आणि परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात दोन टी-२० सामने होणार आहेत. हे सर्वच सामने टीम इंडियाने जिंकेल तर अव्वल स्थान पटकाविण्याची संधी आहे.
सध्या आयसीसीच्या टी-२० च्या जागतिक क्रमवारीत भारत १२० गुणांसह तिस-या स्थानावर आहे. हे उर्वरीत तीन सामने जिंकल्यास भारताच्या खात्यावर आणखी १२ गुण जमा होतील. त्यामुळे क्रमवारीत प्रथमच भारताला अग्रस्थान गाठण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे आगामी काळात टीम इंडियाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. त्यांच्या कामगिरीकडे आता सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून रहीले आहे.