फेसबुक देणार सशुल्क मेसेजिंग सेवा

सॅन फ्रॅन्सिस्को: फेसबुकवर अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठविण्यासाठी १ डॉलरचे शुल्क आकारण्याचा कंपनीचा विचार असून त्याच्या व्यवहार्यतेबद्दल चाचण्या सुरू आहेत.

आतापर्यंत फेसबुकवर कुणालाही मेसेज पाठविण्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठविण्यासाठी नाममात्र आकारणी केल्यास स्पॅम मेसेजेसना आळा बसेल; मेसेजमधून व्हायरस येण्याचे प्रमाण घटेल; त्याचबरोबर ज्यांना खरोखरंच महत्वाचा मेसेज फ्रेंड लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला पाठविणे आवश्यक आहे; त्यांना अधिक वेगवान आणि दर्जेदार सेवा देणे शक्य होईल; असा विश्वास कंपनीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

फ़ेसबुकने यापूर्वीच पेड पोस्टची सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांची पोस्ट ६ डॉलर्स शुल्क आकारणी करून अधिक ठळक, अधिक काळ आणि त्वरित दिसते.

Leave a Comment