हिमाचल प्रदेशात काँग्रेसला पूर्ण बहुमत

सिमला: प्रत्येक निवडणुकीतील लौकिकाला अनुसरून हिमाचल प्रदेशातील सत्तेचे दान मतदारांनी काँग्रेसच्या पदरात टाकले आहे. बहुतेक वेळेला विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला फटका बसतो आणि विरोधकांना खुर्ची मिळते; असा हिमाचल प्रदेशचा इतिहास आहे. मात्र यावेळी केंद्र सरकारच्या नाराजीचा फायदा मिळून पुन्हा सत्ता हस्तगत करण्याची खात्री भाजपला होती. प्रत्यक्षात मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमताने निवडून देऊन भाजपच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे.

मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्या टप्प्यात भाजपच्या उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली होती. त्यामुळे सुरुवातीचा कल भाजपच्या बाजूने असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र दुपारपर्यंत भाजपला पिछाडीला टाकत काँग्रेसने मोठी मुसंडी मारली. एकूण ६८ सदस्यांच्या विधानसभेतील ३६ जागांवर काँग्रेस उमेदवारांनी विजय मिळविला. भाजपला २४ जागा मिळाल्या तर अन्य उमेदवारांनी ४ ठिकाणी विजय मिळविला.

भाजपला मतदारांच्या नाराजीबरोबरच पक्षांतर्गत हेवेदाव्यामुळे पराभवाची चव चाखावी लागली आहे.

Leave a Comment