भारताच्या बाजारपेठेसाठी जर्मन कार उत्पादकांत चुरस

भारताच्या कार मार्केटमध्ये लकझरी कार क्षेत्रात असलेल्या जर्मन कंपन्या बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझ आणि ऑडी यांत आपसातच मोठी चुरस निर्माण झाली असून या कंपन्यांनी आपलेच वर्चस्व राहावे यासाठी जिंकू किवा मरू अशी पॉलिसी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. २०१२ च्या पहिल्या आठ महिन्यात या कंपन्यांनी १६२७५ गाड्या विकल्या असून वर्षअखेरीपर्यंत हा आकडा २० ते २५ हजारांवर नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष म्हणजे विकल्या गेलेल्या या गाड्यांच्या किमती २१ लाखांपासून ते १.७ कोटी रूपयांपर्यंत आहेत.

आपल्याच कंपनीच्या गाड्या अधिक विकल्या जाव्यात यासाठी या तिन्ही कंपन्यांनी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. नवीन मॉडेल्स आणि नवी उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यामुळे फेरारी, लोम्बुर्गिनी, मसरट्टी, ऑस्टीन मार्टीन, रोल्स राईस, जग्वार या कंपन्यांना आपला बाजारातील हिस्सा मिळविण्यासाठी झगडावे लागत असल्याचेही दिसून येत आहे.

मर्सिडीजने आपला अव्वल क्रमांक कायम राखला असला तरी एप्रिल ते नोव्हेंबर या काळात या गाडीच्या विक्रीत ६ टक्के घट नोंदविली गेली आहे. भारतीय बाजारात प्रथमच अशी घट नोंदविली गेली आहे. तर ऑडीने दुसर्‍यां नंबरवर असलेल्या बीएमडब्ल्यूला कधीच मागे टाकून आपले स्थान दुसर्‍यां क्रमांकावर आणले आहे. ऑडीने विक्रीत ४६.७० टक्के वाढ नोंदविली आहे. अर्थात या तिन्ही कंपन्यांनी २०१३ साल जरा नरमाईचे जाईल अशीच अपेक्षा केली असली तरी २०१४ सालात मात्र ही स्पर्धा अधिक तीव्र करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

बीएमडब्ल्यूने विविध किमतींची मॉडेल्स बाजारात आणण्याची तयारी केली असून कमी किमतीची हचबॅक सेडन सात पुढील वर्षात आणण्याची तयारी केली आहे.या हचबॅकची असेब्लीही भारतात होणार असून तीनही कंपन्यांनी भारतातील असेब्लीत तयार होणार्याी गाड्याच भारतीय बाजारात उतरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.