गुजरातेत मोदींची हॅट्रिक

अहमदाबाद: बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने; पर्यायाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी निर्विदाद वर्चस्व राखले. मागील विधानसभेपेक्षा अधिक जागा मिळवून मोदी यांनी मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक साधली.

या निवडणुकीत भाजपने बिधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ११६ जागांवर विजय प्राप्त केला. मागच्या विधानसभेत भाजपच्या ११७ जागा होत्या. सरकारस्थापनेसाठी ९२ आमदरांचे संख्याबळ पुरेसे ठरते. मोदी दि. २५ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शपथ ग्रहण करणार आहेत.

या निवडणुकीत काँग्रेसला मागच्या विधानसभेइतक्याच ६२ जागा मिळाल्या; तर केशुभाई पटेल यांचे उमेदवार केवळ २ जागांवर निवडून आल्याने त्यांचा बार फुसकाच ठरला.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारांच्या तुलनेत मोठ्या संख्येच्या फरकाने आघाडीवर होते. त्यावरून राज्यात भाजप मोठा विजय संपादन करणार; असे चित्र निर्माण झाले. मात्र मतमोजणी पुढे सरकतानाच भाजपची आघाडी कमी होत गेली. भाजप मागच्या विधानसभेतील आमदार संख्येएवढा ११७ चा आकडा तरी गाठू शकेल की नाही; याबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी; एवढी मजल काँग्रेसने मारली. मात्र काही काळाने मतांचे पारडे पुन्हा भाजपच्या दिशेने वळले आणि भाजप उमेदवारांची आघाडी वाढू लागली. या सतत बदलत्या आकडेवारीच्या थराराने मतमोजणीत रंग भरले.

Leave a Comment