कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने स्मार्टफोन व संगणक युजरना कोणत्याही वेळी हवेच्या प्रदूषणाची पातळी सांगू शकणारे पोर्टेबल सेन्सर्स उपलब्ध करून दिले असून त्याचा सर्वाधिक फायदा दमा अथवा तत्सम श्वसनाचे त्रास असणार्यांउना हेाऊ शकणार आहे. सिटी सेन्स सेन्सर्स असे या नव्या उपकरणाचे नामकरण करण्यात आले असून त्यामुळे ज्या भागात युजर असेल त्या भागातील हवेत ओझोन, नायट्रोजन डाय ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड या वायूंचे प्रमाण त्वरीत कळू शकणार आहे. हे वायू प्राधान्याने हवा प्रदूषित करत असतात आणि वाहनांच्या धूरातून हे प्रदूषण जास्त प्रमाणात होत असते.
स्मार्टफोन आणि संगणकावरही वापरता येणारे हे सेन्सर्स कलरकोडच्या रूपात प्रदूषण पातळी सांगणार आहेत. म्हणजे हिरवा रंग दाखविल्यास हवा चांगली आहे, जांभळा रंग दाखविल्यास हवेत प्रदूषण जास्त आहे. युजरला प्रत्यक्ष त्यावेळच्या हवेची गुणवत्ता सांगणारी ही एकमेव एअर क्वालिटी मॉनिटर सिस्टीम असल्याचा संशोधकांचा दावा आहे.
संशोधकांनी असे १०० सेन्सर्स ३० युजरना चार आठवड्यांसाठी वापरायला दिले तेव्हा त्यांच्याकडून गोळा झालेल्या डेटातून बर्या०च मोठ्या विभागाची प्रदूषण पातळी समजू शकली असे पथकप्रमुख प्रो.केव्हीन पॅट्रिक यांनी सांगितले. हे संशोधन सॅन दिएगो येथे भरलेल्या वायरलेस हेल्थ परिषद २०१२त प्रसिद्ध करण्यात आले असून या संशोधकांच्या पथकात दोन भारतीय मूळ असलेल्या संशोधकांचाही समावेश आहे.