मार्क झुकेरबर्गने दान केले ५० कोटी डॉलर्स

सॅन फ्रान्सिस्को दि.१९ – सिलीकॉन व्हॅली कम्युनिकेशन फौंडेशन या चॅरिटी संस्थेसाठी फेसबुकचा चीफ एक्झिक्युटिव्ह मार्क झुकेरबर्ग याने आपल्या फेसबुक शेअरमधील संपत्तीतून ५० कोटी डॉलर्सची देगणी दिली असून मार्कने दिलेली ही दुसरी मोठ्या रकमेची देगणी आहे. २८ वर्षीय मार्क जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन सोशल नेटवर्कचा म्हणजे फेसबुकचा सहसंस्थापक आहे. त्याने वरील संस्थेला आपण देगणी दिल्याचे मंगळवारी जाहीर केले असून याचा विनियोग ही संस्था शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी करत असलेल्या कामात करण्यात येणार आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस आणि गुंतवणूकदार वॉरन बफेट यांनी सुरू केलेल्या फौंडेशनने २०१० साली गिव्हींग प्लेज संकल्पना राबविली असून त्यात आपल्या संपत्तीतील किमान अर्धी संपत्ती आयुष्यभरात किवा मृत्यूनंतर दान करावी अशी कल्पना आहे. झुकेरबर्गने या गिव्हींग प्लेजला अनुसरून आपल्या संपत्तीतील कांही रक्कम दान करण्यास सुरवात केली आहे. झुकेरबर्गच्या नावावर फेसबुकचे ११ अब्ज शेअर्स असून त्यातील १८ दशलक्ष शेअर्समधून येणारी रक्कम सिलीकॉन व्हॅलीतील वरील संस्थेला दान केली आहे. सध्याची या शेअरची किंमत २७.७१ डॉलर्स प्रतिशेअर अशी आहे. त्यानुसार ही रक्कम ४९८.८ दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे ५० कोटी डॉलर्स होते.

फेसबुकचे जगभरात १ अब्ज युजर आहेत.

Leave a Comment