अण्णांच्या आंदोलनाला कलाम यांचा पाठींबा

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून देशात सशक्त कायदा बनविला जाईल आणि भ्रष्टाचाराला आळा बसू शकेल; असा विश्वास माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांनी व्यक्त केला.

एका कार्यक्रमासाठी राजधानीत आलेल्या कलाम यांनी युवकांशी संवाद साधला.

देशातील युवकांवर आपला विश्वास असून त्यांच्या योगदानामुळे २०२० सालापर्यंत भारत आर्थिक दृष्ट्या विकसित बनलेला असेल; असा विश्वासही डॉ. कलाम यांनी व्यक्त केला. भारताला दूरदर्शी नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Leave a Comment