नवी दिल्ली: विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडूलकर याच्या राज्यसभा सदस्यत्वावर आक्षेप घेणारी याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सदस्यत्वावर कायदेशीर मान्यतेची मोहोर उमटविली.
नवी दिल्ली: विक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडूलकर याच्या राज्यसभा सदस्यत्वावर आक्षेप घेणारी याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सदस्यत्वावर कायदेशीर मान्यतेची मोहोर उमटविली.
सचिन घटनेच्या कलम ८० चे निकष पूर्ण करीत नसल्याने त्याची राज्यसभा सदस्यत्वाची निवड बेकायदेशीर आहे; असा दावा करणारी याचिका रामगोपालसिंग सिसोदिया यांनी दाखल केली होती. या प्रकरणी शासनाकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे की; घटनेतील कलम ८० च्या तरतुदीनुसार साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रांप्रमाणेच क्रिडा, शिक्षण अणि अन्य क्षेत्रातील व्यक्तींची निवड करता येते.
अतिरिक्त महाधिवक्ता रवी मेहेरा यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्या. मरुगेसेन आणि न्या. राजीव सहाय यांच्या खंडपीठाने सिसोदिया यांची याचिका फेटाळून लावली.