लंडन: येत्या ५० वर्षात मानवी क्लोन तयार करण्याचे यंत्र मानवाला अवगत झालेले असेल; असा विश्वास या वर्षीचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सर जॉन गॉर्डन यांनी व्यक्त केला. मात्र मानवावर या प्रकारचे प्रयोग करण्यापूर्वी क्लोन तयार करण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
मानव हा निसर्गाकडूनच शिकत असतो. अगदी हुबेहूब दिसणारी जुळी मुले नेहेमी पाहायला मिळतात. निसर्गाच्या चमत्काराची हीच प्रक्रिया अवगत करण्याचा मानवाचा प्रयत्न आहे; असेही सर गॉर्डन म्हणाले.
मानवी क्लोनबद्दल वेज्ञानिक आणि विचारवंतांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. मानवी क्लोनिंगच्या चांगल्या परिणामांपेक्षा वाईट परिणाम अधिक असतील; असा एक विचारप्रवाह आहे.