दबंग-३’ – चुलबुलच्या ’दबंग’गिरीची सुरूवात

सध्या दबंग २ च्या प्रमोशनमध्ये गुंतलेल्या सलमान खानने पत्रकारांशी बोलताना दबंग ३ सिनेमाचाही विषय काढला. ’दबंग-२’ नंतर ’दबंग-३’ सिनेमाही तयार असून हा वास्तवात दबंगची सुरूवात असेल.

या सिनेमात सलमान खान भ्रष्ट पण चांगल्या मनाच्या पोलीस इन्पेक्टरची भूमिका निभावत आहे. दबंग ३ ही दबंग मालिकेतील तिसरी फिल्म असली, तरी यात चुलबुल पांडेचा बालपणापासूनचा प्रवास असेल. या सिनेमात चुलबुल पांडे हा इन्स्पेक्टर चुलबुल पांडे कसा बनला याची जन्मकथा पाहायला मिळेल. मात्र जर दबंग २ सिनेमा सुपरहिट झाला, तरच दबंग ३ आम्ही रिलीज करू, असं सलमान खान म्हणाला.

दबंग ३ सिनेमामध्येही सोनाक्षी सिन्हा असेल का, या प्रश्नावर सलमान म्हणाला, की दबंग ३ मध्ये सोनाक्षीची भूमिका आहे. पण या सिनेमात ती आणि मी समोरासमोर आलेले दिसणार नाही. ती आणि तिच्या वडिलांची भूमिका करणारा महेश मांजरेकर दोघेही सिनेमात असतील.

Leave a Comment