ब्रिटनमध्ये लवकरच प्लॅस्टीक चलनी नोटा

लंडन दि.१८ – अधिक टिकावू, वॉटरप्रूफ आणि सहजी कॉपी न करता येणार्याा प्लॅस्टीकच्या चलनी नोटा चलनात आणण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला असून त्यामुळे गेली ३०० वर्षे वापरात असलेल्या कागदी नोटा आता इतिहासजमा होणार आहेत. येत्या तीन वर्षात पॉलिमरच्या चलनी नोटा ब्रिटनमध्ये वापरात आणल्या जाणार असून त्यासाठी बँक ऑफ इंग्लंडने १ अब्ज किमतीच्या निविदा मागविल्या आहेत. २०१५ पासून डेबेन इसेक्स येथे नोटा छापणार्याम प्रेसमध्ये या नोटांची छपाई सुरू करण्यात येणार आहे.

पॉलिमरच्या नोटा बनविणार्याट जगात दोनच कंपन्या असून त्यातील एक डे ला रू ही कंपनी असून तिच्याकडे २००३ पासूनच हे कंत्राट आहे. ही कंपनी जगातील विविध १५० प्रकारच्या प्लॅस्टीक करन्सी नोटांची छपाई करते. पॅसिफिक आयलंड फिजीमध्ये या कंपनीने नुकतीच नवीन प्लॅस्टीक नोट चलनात आणली आहे. बनावट नोटांना आळा घालता यावा यासाठी १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियाने सर्वप्रथम प्लॅस्टीक नोटा चलनात आणल्या आणि त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला असल्याचे सांगितले जाते.