शिवसेना आमदारांमध्ये नाराजी

नागपूर: शिवसेनेतील वरिष्ठ नेते तरुण अणि ग्रामीण भागातील आमदारांना बोलण्याची संधी देत नसल्याची नाराजी शिवसेना आमदारांच्या वैठकॆत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शिवसेना विधिमंडळात जबाबदारीमध्ये फेरबदल होण्याचे संकेत शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिले.

अधिवेशनात तसेच सभागृहात तरुण आमदार अणि ग्रामीण भागातून निवडून आलेल्या आमदारांना बोलू दिले जात नाही. त्यांच्या स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्यात येत नाही; असा नाराजीचा सूर काही आमदारांनी शिवसेनेच्या बैठकीत लावला. त्यांच्या नाराजीचा रोख पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर आहे.

दरम्यान; शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी उभारण्यात आलेला चौथरा सोमवारी शिवसैनिक स्वत: काढणार आहेत. सोमवारी सकाळी त्या ठिकाणी पूजाविधी पार पडणार असून त्यासाठी सर्व ठाकरे कुटुंबीय उपस्थित असणार आहेत. शिवसेनेने ‘शिवतीर्था’चा आग्रह सोडल्याने या जागेवरून सुरू झालेला वाद संपुष्टात आला आहे.

Leave a Comment