शासकीय वेबसाईट हॅकिंगच्या प्रमाणात वाढ

नवी दिल्ली: इंटरनेटच्या प्रसाराबरोबरच सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने विशेषत: शासकीय विभागांनी आपली वेबसाईट सुरक्षित राखण्यासाठी नियमित ऑडिट करण्याच्या सूचना दिल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले.

मागील तीन वर्षात वेबसाईट हॅक करण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून या वर्षात ओक्टोबर पर्यंत १४ हजाराहून अधिक वेबसाईट हॅक करण्यात आल्या. त्यापैकी २९४ वेबसाईट या शासकीय विभागांच्या आहेत.

मे अणि जून महिन्यात शासकीय वेबसाईट हेक करण्याचे सर्वाधिक प्रयत्न झाल्याची माहितीही सिब्बल यांनी दिली.

Leave a Comment