धोनी व कोहलीने डाव सावरला

नागपूर येथिल चौथ्या आणि अतिंम कसोटी सामन्यात अडचणीत आलेल्‍या टीम इंडियाला फॉलोऑनच्या संकटातून तिस-या दिवशी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीने बाहेर काढले. दोघांनी उपहारापर्यंत सावध फलंदाजी करताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. या दोघांच्या खेळीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. शेवटचे वृत हाती आले तेंव्हा भारताने चार बाद १४६ धावा केल्या होत्या.

शुक्रवारी खेळ संपला त्‍यावेळी भारत पहिल्‍या डावात २४३ धावांनी पिछाडीवर होता. चार खंदे फलंदाज बाद झाल्यानंतर शनिवारी ही पिछाडी भरून काढत कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीने सावध खेळ केला. कालच्या चार बाद ८७ धावावरून पुढे खेळ सुरु झाला तेंव्हा उपहारापर्यंत त्याने आणखी काही पडझड होऊ न देता चांगली खेळी करत पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. इंग्लंड सोबतच्या मालिकेत बरोबरी साधन्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे.

शेवटचे वृत हाती आले तेंव्हा भारताने चार बाद १४६ धावा केल्या होत्या. कर्णधार धोनी नाबाद ३१ तर कोहली नाबाद ४६ धावावर खेळत होता. या जोडीला आणखी मोठी भागीदारी करवी लागणार आहे.

Leave a Comment