भारताची खराब सुरुवात; इंग्लंड सर्वबाद ३३०

नागपूर येथील निर्णयक चौथ्‍या कसोटी सामन्यात इंग्‍लंडला ३३० धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आले. त्यानंतर खेळताना भारतीय डावाची सुरुवात खराब झाली असून विरेंद्र सेहवाग पहिल्‍याच षटकात बाद झाला. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा टीम इंडियाने एक गडी बाद २६ धावा केल्या होत्या.

कालच्या ५ बाद १९९ धावसंख्येवरून खेळ पुढे सुरु झाला तेंव्हा भारतीय गोलंदाजांनी उपहारानंतर तासाभरात इंग्‍लंडचा डाव ३३० धावांमध्‍ये संपुष्‍टात आणला. जे. रुट आणि ग्रॅहम स्‍वानने दमदार फलंदाज केली. रुट बाद झाल्‍यानंतर उर्वरित फलंदाज झटपट बाद झाले. ग्रॅहम स्‍वानने आक्रमक अर्धशतक झळकावताना ५६ धावांवर बाद झाला. पियुष चावलाने सर्वाधिक ४ बळी घेतले. इशांत शर्माने ३, जडेजाने २ आणि अश्विनने १ बळी घेतला.

जे. रुट आणि गॅहम स्‍वान जोडीने अर्धशतकी भागीदारी करुन भारतीय गोलंदजांना हैराण केले. पियुष चावलाने रुटला स्‍वतःच्‍याच गोलंदाजीवर झेलबाद केले. रुटने कडवा प्रतिकार करीत ७३ धावांची खेळी केली. त्यापूर्वी आर. अश्विनने मॅथ्‍यू प्रायरचा त्रिफळा उडवून इग्‍लंडला सहावा धक्‍का दिला. प्रायरने ५७ धावा केल्‍या. तर त्‍यानंतर इशांतने टीम ब्रेस्‍ननला शून्‍यावर पायचीत केले. ही जोडी फोडल्‍यानंतर रुट आणि स्‍वानने अर्धशतकी भागीदारी करुन धावसंख्‍या वाढविली आणि इंग्‍लंडची धावसंख्‍या ३०० वर नेली. मॅथ्‍यू प्रायर आणि रूट दोघांनी शतकी भागीदारी केली. दोघांनीही आज अर्धशतके पूर्ण केली. दोघांच्‍या भागीदारीमुळे इंग्‍लंडचा डाव सावरला.

त्यानंतर फलंदाजी करताना भारतीय डावाची सुरुवात खराब झाली विरेंद्र सेहवाग पहिल्‍याच षटकात अंडारसनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. मात्र त्यानंतर गंभीर व पुजाराने संयमी फलंदाजी केली. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा टीम इंडियाने एक गडी बाद २६ धावा केल्या होत्या.

Leave a Comment