
पुढच्या आठवड्यात नासाची ट्वीन अंतराळयाने चंद्रावर उतरत आहेत. चंद्रावरील गुरूत्वाकर्षणाचे मॅपिंग करण्यात यश आल्यानंतर ही याने चंद्रावरील पर्वतावर उतरणार आहेत. नासातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही याने चंद्रावर उतरताना पृथ्वीवरून दिसू शकणार नाहीत. ही याने अगदी हलकी आणि छोटी आहेत त्यामुळे ती जेथे उतरतील तेथे विवर पडणार नाही तसेच धुळीचे लोटही उठणार नाहीत. पूर्वी अपोलो याने जेथे उतरली त्यापासून ही जागा खूप दूर असल्याचेही समजते.