लोकपाल मंजूर झाल्यावर राईट टू रिजेक्टसाठी लढा- अण्णा हजारे

वाराणसी दि.१३ – केंद्र सरकारने २०१४ पर्यंत स्ट्राँग लोकपाल बिल मंजूर केले नाही तर पुन्हा दिल्लीच्या रामलिला मैदानावर सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे नेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे. लोकपाल आल्यानंतर आम्ही राईट टू रिजेक्ट साठीची चळवळही हाती घेणार आहोत असेही अण्णांनी जाहीर केले असून ते वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौर्याेवर आले आहेत. त्यांच्यासोबत माजी लष्करप्रमुख व्ही.के. सिंग हेही आहेत.

म.गांधी कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मेंळाव्यात मार्गदर्शन करताना अण्णा बोलत होते. ते म्हणाले १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र अजूनही भ्रष्टाचार, गुंडगिरी, लूट सुरूच आहे. तरूणांनी स्वातंत्र्यासाठीच्या दुसर्या् युद्धात सामील व्हायला हवे कारण तरूण हीच या देशाची खरी शक्ती आहे आणि तेच या देशाला चांगली दिशा देऊ शकणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत बदल घडवायचा असा निर्धार तरूणांनी केला तर त्यांना कोणीच अडवू शकणार नाही.

यावेळी अण्णांनी ज्या तरूणांना या चळवळीत सामील व्हायचे आहे, त्यांना एसएमएस नंबर दिला आणि चळवळीत उतरण्यासाठी प्रशिक्षण हवे असेल तर एसएमएस करा, आमच्या चळवळीत सक्रीय सहभागी व्हा असेही आवाहन केले.

Leave a Comment