मल्लिकाच्या ठुमक्याला मुकावे लागणार

नवीन वर्षाच्या स्वगतावेळी अभिनेत्री मल्लिकाचे ठुमके पाहयाला मिळतील असा कोणी जर सध्या विचार करीत असेल तर त्यांच्या साठी सध्या चांगली बातमी नाही. कारण की, या हॉट ब्यूटीने नवीन वर्षाच्या प्रोग्रमसाठी इंडियामध्ये न येण्याचे ठरविले असल्याचे समजते. यापूर्वीच बॉलिवूडची चिकनी चमेली कैटरीना कैफ आणि फेविकोल गर्ल करीना कपूरने नवीन वर्षानिम्मित परफॉर्म करणार नाही असे जाहीर केले होते. त्यामुळे यावर्षी माल्लिका आणि बिपाशा तर परफॉर्म करतील अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे.

दरवर्षी मल्लिका शेरावत ही कुठे ना कुठे तर परफॉर्म करत असते. मात्र गेल्या काही दिवसापासून लॉस ऐंजिलिसला मल्लिकाने बेस बनविले आहे. त्यामुळे ती सध्या भारतात परतण्याच्या मूडमध्ये नाही. इंडस्ट्रीमधील सोर्सने दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षापूर्वीपर्यंत मल्लिका खास पॉप्युलर होती. त्यावेळी तिच्याकडे काही सिनेमा होते त्याशिवाय काही आयटम साँगमधून काम केले होते. त्यामुळेच तिला न्यू इयर पार्टीजमध्ये सुद्धा चांगली डिमांड होती.

सध्या तसे पाहिले तर तिच्याकडे डान्स करण्यासाठी खास गाणे नाही. त्यामुळे ती भारतात येण्यास टाळत असल्याचे समजते. त्यामुळे काही जनना तिने त्याठिकाणीच नवीन वर्ष सेलीब्रेशन करावे असे वाटत आहे. काही फैन्सना मात्र तिची भारतात परतण्याची आशा अजूनही सोडलेली नाही.

Leave a Comment