इंग्लंडची खराब सुरुवात

नागपूर येथील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली आहे. झटपट दोन गडी बाद झाल्याने इंग्लंडचा संघ काहीसा अडचणीत सापडला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने दोन गडी बाद ६८ धावा केल्या होत्या. सलामीवीर निक कॉम्पटन व इंग्लंडचा कर्णधार कुक हे दोघेजण बाद झाले आहेत. केविन पीटरसन आणि जॉनेथन ट्रॉट हे सध्या फलंदाजी करीत आहेत. भारताकडून इशांतने दोन विकेट घेतल्या.

नागपूर येथील सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय इंग्लंड संघाने घेतला. मात्र हा निर्णय त्याच्या अंगलट आला. सलामीवीर निक कॉम्पटन इशांतच्या गोलंदाजीवर धोनीकडे झेल देऊन लगेचच परतला. त्याला आपल्या संघासाठी फार काही करता आले नाही. कॉम्पटन तीन धावांकाढून लगेच बाद झाला. इंग्लंडचा कर्णधार एलिस्टर कूक वादग्रस्तरित्या बाद झाला. एक धाव काढून कूक तंबूत परतला. एक वेळ त्यांची अवस्था दोन गडी बाद १६ अशी झाली होती. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा इंग्लंडने दोन गडी बाद ६८ धावा केल्या होत्या. केविन पीटरसन २८ आणि जॉनेथन ट्रॉट हा २८ धावावर खेळत होता. भारताकडून भेदक गोलदाजी करता इशांतने दोन विकेट घेतल्या.

इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत विजय मिळवण्याचे कठीण आव्हान टीम इंडियासमोर उभे आहे. फलंदाजांचा हरवलेला फॉर्म, गोलंदाजांनी गमावलेली लय आणि सलग दोन पराभवामुळे टीम इंडिया बॅकफुटवर आली आहे. प्रतिकूल परिस्थितीत नागपुरात विजय मिळवून मालिकेत 2-2 ने बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेपूर्वी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवन्यासाठी प्रयत्न करीत आहे.

Leave a Comment