स्टुअर्ट ब्रॉडच्या सहभागाबाबत संशय

इंग्लंडच्या टी-२० टीमचा कर्णधार आणी जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड जखमी झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया सोबत आगामी काळात होत असलेल्या दोन टी-२० च्या अंतरराष्ट्रीय सामन्यात सहभागी होणार की नाही याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. स्टुअर्ट ब्रॉड हा जखमी झाला असल्यामुळे गेल्या तीन कसोटी सामन्यात सहभागी झाला नाही.

टीम इंडिया विरुद्ध मुंबई येथील दुस-या कसोटी सामन्यात तो खेळताना जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जखमेचे स्कैन करण्यात आले आहे. टीम इंडिया विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात तो सहभागी झाला होता. मात्र कोलकता येथील तिस-या टेस्टमध्ये त्याला सहभागी होता आले नव्हते. गुरुवारपासून नागपुर येथे सुरु होणा-या चौथ्या टेस्टमध्ये सुद्धा त्याच्या सहभागाबाबत अनिशितता आहे. स्टुअर्ट ब्रॉड हा इंग्लड टी-२० संघाचा एक हिस्सा आहे. त्यामुळे त्याच्यावर संघाची मोठी जबाबदारी आहे.

इंग्लंडने मंगळवारी सराव केला त्यावेळी ब्रॉड लंगडत चालत होता. ब्रॉड जर लवकर फीट झाला नाही तर त्याच्या जागी इंग्लंड संघाला टी-२० च्या सामन्यासाठी नवीन कर्णधार निवडावा लागणार आहे. त्याच्या जागी नवीन कर्णधार म्हणून इयोन मोर्गनची निवड केली जाण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड संघादरम्यान २० आणि २२ डिसेबरला पुणे आणि मुंबईमध्ये टी-२० चा सामना खेळला जाणार आहे.

Leave a Comment